Hot Posts

6/recent/ticker-posts

वारकऱ्यांना पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी नियंत्रण अधिकारी व सहा. कर्मचारी यांची नियुक्ती

 वारकऱ्यांना पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी नियंत्रण अधिकारी व सहा. कर्मचारी यांची नियुक्ती

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद सोलापूर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने आषाढी यात्रा पालखी मार्गावर वारकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा व काही अडचणी येऊ नये  म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पंढरपूर येथे नियत्रण कक्ष स्थापन केला व  एकूण 10  पालखी मार्गावरील टँकर भरणेच्या एकूण 107 ठिकाणचा आढावा घेऊन 142 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली. सदर आढावा प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, उप कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड . प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, रविंद्र करजगी, सर्व उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते.

पालखी मार्गावरील एकुण नियुक्त अधिकारी व कर्मचारी - 142

पालखी मार्गावरील टॅंकर भरण्याचे एकूण ठिकाण - 107


1. संत ज्ञानेश्वर महाराज  
      पालखी मार्गावरील नियंत्रण
      अधिकारी व कर्मचारी - 29

2. संत तुकाराम महाराज  मार्गावरील पालखी नियंत्रण अधिकारी व कर्मचारी -12

3. संत सोपानकाका महाराज पालखी  मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी-05

4. संत गजानन महाराज पालखी महाराज  मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी - 10

5. संत मुक्ताबाई पालखी  मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी - 08

6. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी  मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी - 05

7. संत एकनाथ महाराज पालखी  मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी - 04

8. संत निळोबाराय महाराज पालखी  मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी - 05

9. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी (पंढरपूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर ) मार्गावरील नियंत्रण
      अधिकारी व कर्मचारी - 47

10. चांगावटेश्वर महाराज मार्गावरील नियंत्रण  अधिकारी व कर्मचारी = 06

11. कौडण्यपूर विदर्भ पालखी मार्गावरील नियंत्रण अधिकारी व कर्मचारी - 06

12. नियंत्रण कक्ष पंढरपूर येथील नियुक्त अधिकारी व कर्मचारी  -. 5
Reactions

Post a Comment

0 Comments