शाळेसमोर पान टपरी दिसल्यास दंडासहीत शिक्षेची कारवाई करू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

शाळेसमोर पान टपरी दिसल्यास दंडासहीत शिक्षेची कारवाई करू

 शाळेसमोर पान टपरी दिसल्यास दंडासहीत शिक्षेची कारवाई करू



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खासगी व सरकारी शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे. शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पान टपऱ्यांवर कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर पानपट्टी थाटण्याचाही इशारा देण्यात आला.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळा परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी केली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, रोजगार व स्वयंरोजगारचे जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, मनविसे शहर उपाध्यक्ष अनिकेत उपासे, संतोष बारटक्के, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, सैपन जमखंडी, सुनील जगले, वैभव रंपुरे, आकाश देशमुख व मनसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages