आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण

 आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण



मुंबई (कटूसत्य वृत्त):- आता राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे बेसिक प्रशिक्षण असेल. राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात आता इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली आहे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) स्काऊट गाईड्स हे विद्यार्थ्यांना हे लष्करी प्रशिक्षण देतील. त्यासाठी राज्यातील 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचे भुसे म्हणाले.” इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लगावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.” अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर याविषयीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages