कोनापुरे चाळ आणि राहुल गांधी झोपडपट्टीतील नागरिकांशी खा.शिंदे यांची चर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 3, 2025

कोनापुरे चाळ आणि राहुल गांधी झोपडपट्टीतील नागरिकांशी खा.शिंदे यांची चर्चा

 कोनापुरे चाळ आणि राहुल गांधी झोपडपट्टीतील नागरिकांशी खा.शिंदे यांची चर्चा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दुर्बल घटकातील नागरिकांचे राहणीमान उंचविण्याकरिता तसेच सोलापूर महानगरपालिका मार्फत शासकीय योजना अंतर्गत उत्तम नागरी सेवा देता यावे जेणेकरून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेता येईल या उद्दिष्टाने केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने PMAY -AHP या योजने अंतर्गत कोनापुरे चाळ, राहुल गांधी झोपडपट्टी येथे पक्की घरे बांधून देण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि अधिकारी वर्ग यांच्यासोबत पाहणी करून तेथील नागरिकांशी चर्चा केली.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी या कोनापुरे चाळ आणि राहुल गांधी झोपडपट्टीतील नागरिकांना विश्वासात घेऊन याचा लवकर प्रारुप आराखडा तयार करून याची अंमलबजावणी करण्यात यावी सूचना केली. आयुक्तांनी यासाठी संबंधितांना सुचना देण्यात दिल्या.

यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, मा. नगरसेविका श्रीदेवी फुलारे, कोनापुरे चाळीचे चेअरमन बसवराज म्हेत्रे, रंगनाथ मरेड्डी, शिवराम जगले, नागनाथ म्हेत्रे, राजू अलकोड, सुशीलकुमार म्हेत्रे, रवी आसादे, सदानंद म्हेत्रे, अंबादास नाटेकर, मल्लू म्हेत्रे, राहुल गांधी झोपडपट्टीतील असिफ तिम्मापुरे, हारून शेख, बडेपीर मेंबर, बाबा शेख, इम्तियाज दर्जी, सलीम बॉस, रफिक रामपूरे, मौलाली दर्जी, मुबिन बडेपीर, राजू कट्टिमनी, अशोक शिंदे, मनुद्दीन सिद्दिकी, गौस शानदार, मुर्तुज बडेपीर, नसीमा आपा, मुन्नी आपा यांच्यासह झोपडपट्टीतील नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages