गुरुजींची चिंता वाढली, आता तक्रार आली की बदली होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 3, 2025

गुरुजींची चिंता वाढली, आता तक्रार आली की बदली होणार

 गुरुजींची चिंता वाढली, आता तक्रार आली की बदली होणार




मुबंई (कटूसत्य वृत्त):- शिक्षकांची तक्रार आल्यास 30 दिवसांच्या आत चौकशी करून बदलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवावा लागणार आहे, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंगर्त बदल्यांच्या धोरणत ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे.
   जिल्हा परिषदेच्या गुरुजींच्या गैरवर्तणूकी बद्दल तक्रार आल्यास बदली होणार असल्याने चिंता वाढली आहे. मात्र, तक्राराचे स्वरूप स्पष्ट नसल्याने बदली प्रक्रियेचा दुरुपयोग होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या  गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यास सीईओ तक्रारींमधील गंभीर्य विचारात घेतली, सबंधित शिक्षकाला त्या पदावर ठेवणे योग्य नाही, असे मत झाल्यास करणमीमांसा नमुद करुन करून विभागीय आयुक्ताकडे शिक्षकाची बदली प्रस्तावित करतील.
   तक्रारींची कार्यवाही साईओना 30 दिवसांत पूर्ण करावी लागेल, पत्रात तक्रारीची स्वरूप स्पष्ट नाही, त्यामुळे एखादया शिक्षकाला बदली हवी असल्यास तो दुसऱ्या व्यक्तीला तक्रार करायला लावू शकतो, त्यामुळे दुसऱ्या तालुक्यात बदलीचा उद्देशही साध्य केला जाऊ शकतो.

विभागीय आयुक्तांची सहमती नसल्यास काय?
विभागीय आयुक्ताकडे बदलीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास सबंधीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या कारणांची छाननी करून 30 दिवसांच्या आत बदलीस सहमती दर्शवावी लागेल, सीईओनी सादर केलेल्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांची सहमती नसल्यास त्याबाबत लेखी करणे नमूद करणे आवश्यक राहणार आहे.

फाईलवर नजर
शिक्षकांच्या गैरवर्तनाची तक्रार झाल्यास त्याचे गांभीर्य विचारात घेऊन साईओना 30 दिवसांत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. गैरवर्तन तक्रारीच्या येणाऱ्या फाइलवर बारीक नजर ठेवावी लागणार आहे.

साईओनां सहमतीनंतर होणार निर्णय

सातदिवस चौकशीअंती विभागीय आयुक्त बदलीस सहमती दर्शवतील, शिककाची ऑफलाईन बदली सीईओनां सहमती प्राप्त झाल्यापासून सात दिवसांत करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages