शक्तिप्रदर्शन रस्त्यावर नको, करायचे असेल तर सभेत करा! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 24, 2025

शक्तिप्रदर्शन रस्त्यावर नको, करायचे असेल तर सभेत करा!

 शक्तिप्रदर्शन रस्त्यावर नको, करायचे असेल तर सभेत करा!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- : मोहरम हा सण हिंदू-मुस्लिम एकत्र साजरा करतात. आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी असल्याने एकमेकांच्या भावनांचा आदर करून उत्सव शांततेत पार पाडावे. कोणालाही शक्तिप्रदर्शन करायचे असेल तर ते सभेत करावे. रस्त्यावर केल्यास ते शोभणारं नाही तसेच मिरवणूक निघते त्यावेळी, बाईक रॅली काढू नका. जर रॅली काढत असाल तर वाहनांची कागदपत्रे जवळ बाळगा नंतर चौकशीला बोलवल्यानंतर नाराज होऊ नका, असे आवाहन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी केले


मोहरमच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी (दि.२३) सायंकाळी ४ वाजता पोलिस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठकीत पोलिस आयुक्त एम. राजकुमार बोलत होते. यावेळी पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेचे नगरअभियंता दिवाणजी, शहर काझी, मुस्लिम धर्मगुरू, मौलाना आदी उपस्थित होते.


यावेळी नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. त्यात प्रामुख्याने मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या काढाव्यात, रस्त्याची साफसफाई करावी, मिरवणूक परवानगी ऑफलाईन देण्याची सोय करावी शिवाय काहीवेळा वाहतूकसंबंधी अडचणी येतात, अशा समस्या मांडल्या. यावेळी मनपाचे नगर अभियंता विभागाचे दिवाणजी यांनी या अडचणी लवकरच सोडवू शिवाय, रस्त्याच्या पोलवर लावण्यात आलेले अनधिकृत बॅनरही हटवू, असे सांगितले.


बैठकीची प्रस्तावना पोलिस उपायुक्त डॉ. दिपाली काळे यांनी केली. मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणीही, कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने वर्गणी देणगी मागू नये. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मंडप मारताना २/३ भाग मोकळा सोडावा. पंजे सवारी संरक्षणासाठी प्रत्येकाने आपल्याकडील स्वयंसेवक

नेमावेत. अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याने वागावे, असे आवाहन केले.


यावेळी पोलिस उपायुक्त अजित बो-हाडे, विजय कबाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, सुधीर खिरडकर, राजन  माने, सोलापूर महानगरपालिकेचे सागर खरोसेकर, महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, धर्मादय कार्यालयाकडील असिफ शेख, अग्निशामक दलाचे समीर पाटील, किरण चव्हाण आदी उपस्थित होते.


मुलांवर लक्ष ठेवा

उत्सव साजरा करताना कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. शिवाय पालकांनी आपली मुलं कुठं जात आहेत, याची माहिती घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages