डिपीसीच्या १८ सदस्यांच्या निवडी रखडल्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 17, 2025

डिपीसीच्या १८ सदस्यांच्या निवडी रखडल्या

 डिपीसीच्या १८ सदस्यांच्या निवडी रखडल्या

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा नियोजन समितीत १८ सदस्यांची जागा रिक्त आहेत. या निवडी रखडल्याने महायुतीतील कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मागील पाच वर्षात अडीच वर्ष महाविकास आघाडी आणि नंतरचे अडीच वर्ष महायुतीचे शासन आले. नुकतेच सात महिन्यांपूर्वी पुन्हा महायुती सत्तेवर आली. नेत्यांना मंत्रीपदे, आमदारकी मिळाली. परंतु, कार्यकर्ते पदाच्या प्रतिक्षेत आहेत.


जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित तसेच विशेष निमंत्रित सदस्यांच्या एकूण १८ जागा रिक्त आहेत. डिपीसीवर आपली वर्णी लागावी, यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असून भाजप, शिंदे सेना तसेच अजित पवार गटाला नेमक्या किती जागा मिळतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री होऊन सहा महिने होत असल्याने सदस्यांच्या नावाची शिफारस केलेली नाही.


१४ निमंत्रित सदस्य तसेच ४ विशेष निमंत्रित सदस्य अशा एकूण १८ जागा रिक्त आहेत. ३० जानेवारी नंतर जून महिन्यात डिपीसीसी बैठक झाली. आता पुढील बैठकीसाठी आणखी तीन महिन्यांचा अवकाश आहे. तोपर्यंत निवडी जाहीर होतील की पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार याबाबत कार्यकर्त्यांत चलबिचल सुरु आहे.


इच्छुक आतापासून फिल्डिंग लावून दमले आहेत. भाजपातील गटबाजी, शिंदे सेनेतील आयारामांची वाढती संख्या, अजित पवार गटातील मातब्बर नेत्यांची संख्या अधिक असल्याने यातून कोणाची वर्णी लागणार याबाबत गॉडफादरमार्फत लॉबिंग करत आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून संबंधितांची नावे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे येतील. यावर पालकमंत्री चर्चा करून ही नावे मुख्यमंत्र्यांकडे पाठवितात. परंतु अद्याप प्रक्रीयाच सुरु झालेली नाही.


चौकट 

शिंदे सेनेत इनकमिंग अधिक

अक्कलकोटमधून माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, पंढरपूर-मंगळवेढामधून भगीरथ भालके, करमाळ्यातून जयवंतराव जगताप, दक्षिण सोलापूरमधून अमर पाटील यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बळीराम काका साठे ही शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे डिपीसी सदस्य नियुक्तीत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages