जिल्ह्यातील खासगी प्राथमिकच्या 145 शिक्षकांचे वेतन रखडले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 14, 2025

जिल्ह्यातील खासगी प्राथमिकच्या 145 शिक्षकांचे वेतन रखडले

 जिल्ह्यातील खासगी प्राथमिकच्या 145 शिक्षकांचे वेतन रखडले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील खासगी अंशत: अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे वेतन अद्याप जमा झाले नाही. जिल्ह्यातील जवळपास 145 शिक्षकांचे वेतन रखडले आहे.
वेतन देयके ट्रेझरित पाठविण्यात आली होती.त्या दरम्यान वेतन पथकाचे अधिक्षक विठ्ठल ढेपे याची बदली झाल्यामुळे ते कार्यमुक्त झाले. वेतन देयकाला त्रुटी लागल्याने त्रुटीची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेतन पथक अधीक्षकांची स्वाक्षरी आवश्यक आहे. सध्या वेतन पथक अधीक्षकपदी कोणाचीही नेमणूक नसल्याने वेतन देयके सादर करता येत नाही. त्यामुळे टप्पा अनुदानावरील शिक्षकांचे वेतन रथडले आहे.
जोपर्यंत वेतन पथक अधीक्षकपदी कोणाची नेमणूक होत नाही. चार्ज देत नाही, तोपर्यंत वेतन होण्याची शाश्वती नाही. 46 शाळेतील 185 शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण, शिक्षक सेनेचे आप्पाराव पाटील, युवक शिक्षक संघटनेचे संस्थापक आप्पाराव इटेकर, अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ. गफुर अरब हे वेतन व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या प्रश्नासंदर्भात माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुण्याच्या शिक्षण उपसंचालकांना फोन करून हा विषय तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली.
- सुनिल चव्हाण, प्रदेश महासचिव डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदवेतन पथक अधीक्षक पद रिक्त असल्याने शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन रखडले आहे. शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याशी याबाबत चर्चा करुन पदभार देण्याविषयी विनंती केली आहे. याबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages