छत्रपती शिवाजी संकुलात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 26, 2025

छत्रपती शिवाजी संकुलात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 छत्रपती शिवाजी संकुलात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
       संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्या हस्ते सत्कार पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी प्रशाला सह रात्र व दिवस महाविद्यालयाचे राजषीं शाहू माध्यमिक शाळा, काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशाला, व व्यावसायिक अभ्यासक्रम या विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आला.
     याप्रसंगी सपाटे म्हणाले  संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले असून यापुढे संस्थेचे नाव उज्वल  करावे.
    शिवदास चटके, मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, प्राचार्य डॉ.अरुण मित्रगोत्री, मंजुश्री पाटील,किशोर बनसोडे,उदयसिंग पवार यांनी देखील मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
    यावेळी कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष विनायकराव पाटील, महादेव गवळी, मनोज पवार,दत्ता भोसले,प्रियंका पवार, दत्तात्रय सुतार,यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर, विद्यार्थी, पालक, उपस्थित होते.
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जगदाळे यांनी केले तर सुरेश जगताप यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages