सोलापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ७७ हजार दाखल्यांचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 26, 2025

सोलापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ७७ हजार दाखल्यांचे वाटप

 सोलापूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ७७ हजार दाखल्यांचे वाटप




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एकही विद्यार्थी दाखल्याअभावी शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहू नये,
यासाठी प्रशासनाच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून ४६ मंडलातील ७७ हजार २०६ विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहेत. जातीचे दाखले, उत्पन्न, अधिवास, रहिवासी दाखले, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व इतर दाखले असे एकूण ७७ हजार २०६ दाखल्यांचे वाटप करून विद्यार्थी व पालक यांची शैक्षणिक प्रवेशासाठी होणारी गैरसोय टाळली आहे.
दाखल्यांसाठी ११ तहसील कार्यालय व एक अप्पर तहसील कार्यालय यांच्या अंतर्गत असणाऱ्या १२६ महसुली मंडळात शिबिरे आयोजन करून परिसरातील विद्यार्थी व पालकांना दाखले वाटप केले आहेत. उत्तर तालुक्यातील सर्व पंचवीस मंडळात शिबिरे घेण्यात आली आहेत, तर ज्या महसुली मंडळात
अद्यापपर्यंत शिबिरे घेण्यात आलेली नाहीत, त्या मंडळाने शिबिरांचे आयोजन करून दाखले वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.

चौकट
विद्यार्थ्यांना विविध दाखले व प्रमाणपत्राचे
करण्यासाठी समाधान शिबिरांच्या माध्यमातून २१ मे पर्यंत ७७ हजार २०६ विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरित महसुली मंडळातही शिबिरे घेण्याचे प्रस्तावित आहे.
- कुमार आशीर्वाद,जिल्हाधिकारी, सोलापूर.


वितरीत केलेले दाखले
जातीचे दाखले - २९६९, उत्पन्नाचे
दाखले - १८८३७, आदिवासी
दाखले - २२७९, रहिवास दाखले -
२०९२, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र -
२७२६, इतर दाखले २६६६ असे
एकूण दाखले - ३१ हजार ५६९

तहसीलनिहाय दाखले
वाटप संख्या
उत्तर सोलापूर- १७७९६, बार्शी-
८२०२, दक्षिण सोलापूर- १५७२,
अप्पर तहसील मंद्रूप - १७४,
अक्कलकोट-३४०६, माढा-
५३८५, करमाळा - ६०१६, पंढरपूर
- ६५५०, मोहोळ - ५०२५,
मंगळवेढा - ५५९५, सांगोला -
७४४४, माळशिरस- ८४६७.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages