दहावीच्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा अभियांत्रिकीला प्रवेश घ्यावा : प्रा. झोळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 26, 2025

दहावीच्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा अभियांत्रिकीला प्रवेश घ्यावा : प्रा. झोळ

 दहावीच्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा अभियांत्रिकीला प्रवेश घ्यावा : प्रा. झोळ


कोर्टी (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुका व परिसरातील दहावीला ज्या विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा कमी गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी हमखास नोकरी मिळणाऱ्या डिप्लोमा इंजिनिअरींग या

अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, असे आवाहन दत्तकलाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी केले.


प्रा. झोळ म्हणाले, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आपण मागणी केली होती. या आपल्या पाठपुराव्याला

यश आले आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची माहिती घ्यावी व प्रवेश घेताना पाल्यांनी

पालकांना घेऊन जावे. कोणत्या प्रवर्गाला किती आरक्षण आहे याचीही माहिती दिली. इंजिनिअरींगला

मुलींना मोफत प्रवेश दिला जातो. आगामी शैक्षणिक वर्षात आपण देवळाली (ता. करमाळा) या

ठिकाणी आपली दत्तकलेची शाखा सुरु करत आहोत. आपण अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. पॉलिटेक्निक डीप्लोमा इंजिनिअरीग केल्यास पुणे, मुंबईत असणाऱ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये हमखास नोकरी लागते. राज्यातील एकूण ४ लाख ५० हजार विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५० हजार विद्यार्थी प्रवेश घेतात व १ लाख जागा रिक्त राहतात. विद्यार्थ्यांनी वेबसाईट व्यवस्थीत पाहून प्रवेश घ्यावा, घाई घडबड न करता प्रवेश घ्यावा.


पाठीमागील आठवड्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपणास सकारात्मक प्रतिसाद दिला असून काही प्रश्न मार्गी लागले आहेत तर बाकीचे प्रश्न वेळोवेळी सोडवणार असल्याचे प्रा. झोळ म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages