टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४८ ग्रामपंचायतींनी पंचसूत्री उपक्रम राबवावा- पो.नि. पवार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 26, 2025

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४८ ग्रामपंचायतींनी पंचसूत्री उपक्रम राबवावा- पो.नि. पवार

 टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४८ ग्रामपंचायतींनी पंचसूत्री उपक्रम राबवावा- पो.नि. पवार



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ४८ गावे येतात, या गावांमधील प्रत्येक ग्रामपंचायतीने पंचसूत्री उपक्रम राबवण्याची गरज आहे. सध्याच्या काळामध्ये गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गावात शांतता प्रस्थापित करणे, गावाची सुरक्षा अबाधित ठेवणे, याकरिता प्रत्येक गावात ग्रामपंचायतने गुन्हे कमी करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम आवश्यक पंचसूत्री उपक्रम राबवणे आवश्यक आहे. शरीराविरुद्धचे व मालमत्तेचे गुन्हे कमी करणे त्यावर प्रतिबंध करणे हे मुख्य काम वरील पंचसूत्री कार्यक्रमाने करता येईल. त्यासाठी प्रत्येक गावात सरपंच, सर्व सदस्य, पोलीस पाटील आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन पंचसूत्री उपक्रम राबवणे आवश्यक आहे, असे आवाहन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे. 

या माहिती सविस्तर देताना पो.नि. पवार म्हणाले की, तंटामुक्त समिती स्थापन करून ती कार्यान्वित करणे, ग्राम सुरक्षा यंत्रणा चालू ठेवणे, गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करणे व ते अॅक्टिव्ह ठेवणे, गावामध्ये महिला सुरक्षा समिती स्थापन करणे व अॅक्टिव्ह ठेवणे, ग्रामपंचायतीने गावात सीसीटीव्ही कॅमेरे चौकाचौकात बसवणे बंधनकारक केले पाहिजे.

वरील पंचसूत्री उपक्रम टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४८ ग्रामपंचायतीने राबवण्याचे आवाहन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत धापटे यांनी केले आहे. हा कार्यक्रम टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पहिले पोलीस निरीक्षक नारायण पवार असल्याने अशा कार्यक्रमामुळे टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची सर्वसामान्य जनतेतून गेल्या चार महिन्यापासून चर्चा होती त्या चर्चेवरती नक्कीच पूर्णविराम बसेल अशी सर्वसामान्य नागरिकांतून चर्चा होत आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages