अक्कलकोट तालुक्यात राजरोसपणे मुरुमाची चोरी ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 16, 2025

अक्कलकोट तालुक्यात राजरोसपणे मुरुमाची चोरी !

 अक्कलकोट तालुक्यात राजरोसपणे मुरुमाची चोरी !



ठेकेदाराच्या मुजोर पणाला महसूल खाते आवर घालणार काय?

अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात कोणतीही परवानगी न घेता बिनदिक्कतपणे मुरूम, माती, वाळू, दगडाची चोरी होत असल्याचे समोर येत असून, ठेकेदाराच्या मुजोरपणाला शासनाचे संबंधित महसूल अधिकारी आवर घालणार काय?परिसरात बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन करणार्‍यांकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत आहे. परिणामी शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी फिरले आहे. बासलेगाव येथील शिवलिंगेश्वर गुड्ड गावठाण जवळील अख्खा पाझर तलाव मोकळा केलाय,
उडगी शिवारात असलेला नैसर्गिक मुरूम मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याचे दिसून येत आहे. उत्खननात लाखो ब्रास मुरूम चोरट्या पद्धतीने काढल्यामुळे परिसरातील नैसर्गिक पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. दुसर्‍या बाजूने या उत्खननामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला गेला आहे.
परिसरात महसूल, वनविभागाच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन केले जात आहे. त्यामध्ये महसूल विभागाच्या अधिकार्‍यांचाही हात असल्यामुळे हे गौण खनिजाचे उत्खनन दिवसेंदिवस वाढत आहे. जेसीबीच्या साहाय्याने खणल्यामुळे त्यालगतच्या जुन्या झाडांच्या मुळांची माती ढासळून पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
तालुका परिसरात राजरोसपणे जेसीबीद्वारे सुरू असलेल्या मुरूम उत्खननाला महसूल विभागाच्या कोणत्या अधिकार्‍यांचा छुपा आशीर्वाद आहे, याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

 


चौकट :- आनंद बुक्कानेर
( शिवसेना उबाठा तालुका अध्यक्ष )
तालुका स्तरीय काही महसूल विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना पकडून
प्रांतअधिकारी  स्वता:च्या मोबदला साठी शासनाच्या नियमाला धाब्यावर बसून अवैध धंद्याचे पाठराखण करीत आहे. त्यांच्यावर ताबड तोबड कारवाई व्हावी अन्यथा तीर्व आंदोलन करण्यात येईल.


चौकट :-
माझी शेतातील स्वता:ची पाईप लाईन आणि बंधारा तोडले असून दुरुस्ती केले नाही. तसेच दुरुस्ती साठी बोलल्यावर टाळाटाळ करीत असून आणि धमकी वजा देत आहे.
-जमादार शेतकरी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages