संजय संगवई पुरस्कार दत्ता भोसले यांना प्रधान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 16, 2025

संजय संगवई पुरस्कार दत्ता भोसले यांना प्रधान

 संजय संगवई पुरस्कार दत्ता भोसले यांना प्रधान


 
 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे येथील काव्य मित्र संस्थेतर्फे जागतिक मातृदिन, छत्रपती संभाजी महाराज जयंती, कर्मवीर भाऊराव पाटील व ज्येष्ठ दिगवंत विचारवंत संजय संगवई यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय संजय संगवई स्मृती पुरस्कार सोलापुरातील छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे ग्रंथालयीन कर्मचारी दत्ता भोसले यांना प्रदान करण्यात आला.
    पुणे येथील पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथील तारांगण ऑडिटोरियम येथे मातृ तीर्थ सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधवराव यांचे चौदावे वंशज श्रीमंत संभाजी राजे जाधवराव यांच्या हस्ते भोसले यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्नी सुरेखा व कन्या श्रेया भोसले, गोपाळ खुळे सुरवसे  यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक कवी डॉ सुरेश वाकचौरे यांच्या अध्यक्षेखाली व भोसरी येथील उद्योजक डॉ अशोक साळुंखे काव्य मित्र संस्थेचे संस्थापक राजेंद्र सगर, हरिनाथ कांबळे, डॉ संजय जगताप, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 यावेळी संभाजी राजे यांनी मयतीचे कामे करणारे माणसे दुर्मिळ असल्याचे सांगून भोसले यांच्या या कार्याचा गौरव केला.
 या कार्यक्रमास प्रा मधुकर व्यवहारे, प्रा महेश माने, विलास झरेकर, दत्तात्रय  सुतार, प्रसाद गुरुप्रसाद उडता, यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages