दुचाकीवरील महिला भीषण धडकेत ठार,सोलापूर -हैदराबाद रोडवरील घटना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 29, 2025

दुचाकीवरील महिला भीषण धडकेत ठार,सोलापूर -हैदराबाद रोडवरील घटना

 दुचाकीवरील महिला भीषण धडकेत ठार,सोलापूर -हैदराबाद रोडवरील घटना    



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सोलापूर -हैदराबाद रोडवरील रुपाभवानी मंदिराजवळील सोलापूर टेक्स्टाईलसमोर भीषण अपघात झाला. डी-मार्टसमोरील रोडने शेळगीकडे जाणाऱ्या     सोलापूर : सोलापूर -हैदराबाद रोडवरील रुपाभवानी मंदिराजवळील सोलापूर टेक्स्टाईलसमोर भीषण अपघात झाला. डी-मार्टसमोरील रोडने शेळगीकडे जाणाऱ्या दुचाकीला हैदराबाद रोडहून पुण्याकडे जाणाऱ्या जीपने जोरात धडक दिली.चाकीला हैदराबाद रोडहून पुण्याकडे जाणाऱ्या जीपने जोरात धडक दिली.   यात दुचाकीवरील दोन्ही महिला रस्त्यावर पडल्या. रोहिणी सुरेश पुप्पल (वय ४५, रा. शेळगी) या गंभीर जखमी झाल्या असून अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तर उषा नारायण वाघे (वय ३८, रा. लोहारा, जि. धाराशिव) या जखमी झाल्याची माहिती जोडभावी पेठ पोलिसांनी दिली.

बुधवारी दुपारी दुचाकीवरून (एमएच १३, सीसी ३५६९) रोहिणी पुप्पल व उषा वाघे या दोघी शेळगीकडे जात होत्या. त्यावेळी रूपाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील सोलापूर टेक्स्टाईल दुकानासमोर हैदराबाद रोडकडून भरधाव येणाऱ्या जीपचे (एमएच ४२, एयू २०२४) समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यात जीप महामार्गाच्या दुभाजकावर चढला व सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या दुचाकीला धडकली.

यात दोन्ही जखमी महिलांना सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, जीपच्या धडकेत दुचाकीवरून जोरात रस्त्यावर पडलेल्या रोहिणी पुप्पल या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जीप चालकाविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages