काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी अर्थसहाय्य योजना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 29, 2025

काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी अर्थसहाय्य योजना

 काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी अर्थसहाय्य योजना

           
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याच्या कृषी उत्पादनात फलोत्पादन पिकांचा महत्वाचा वाटा आहे. फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिकांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात. यासाठी काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रम, पणन सुविधा व प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी शासनाकाडून अर्थसहाय्य देण्यात येते काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रम पणन सुविधा व प्रक्रियांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी  जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashrta.gov.in या संकेतस्थळावर फलोउत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे

सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक शीतसाखळी प्रकल्प व कांदाचाळ या घटकांसाठी लक्षांक प्राप्त झालेला आहे. एकात्मिक काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र या घटकासाठी (एमआयडीएच योजनेच्या इतर घटकांसोबत जोडलेला असावा.)  खर्च मर्यादा रुपये 35 लाख प्रति युनिट असून,  अनुदान मर्यादा ग्राह्य भांडवली खर्चाच्या सर्वसाधारण क्षेत्रासाठी 35 टक्के व कमाल रुपये 12 लाख 25 हजार आणि अनुसूचित क्षेत्रासाठी 50 टक्के व कमाल रुपये 17 लाख 50 हजार बँक कर्जाशी निगडीत असेल.  तसेच एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पासाठी  खर्च मर्यादा रुपये 10 कोटी प्रति प्रकल्प, ग्राह्य भांडवली खर्चाच्या सर्वसाधारण क्षेत्रासाठी 35 टक्के व कमाल रुपये 3 कोटी 50 लाख आणि अनुसूचित क्षेत्रासाठी 50 टक्के व कमाल रुपये 5 कोटी  बँक कर्जाशी निगडीत आहे. 
          
        प्राथमिक प्रक्रिया केंद्र व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्प योजनेसाठी  घटकांसाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादनक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता गट नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये किमान 25 सदस्य असतील) शेतकरी उत्पादक कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग,  ग्रामपंचायत  पात्र आहे. 

         तसेच  5, 10, 15, 20 व 25 मेट्रीक टन कांदाचाळीसाठी  10 हजार प्रति मेट्रीक टन खर्च मर्यादेसाठी, 5 हजार प्रति मेट्रीक टन अनुदान मर्यादा आहे.  25 ते 500 मेट्रीक टन कांदाचाळीसाठी 8 हजार प्रति मेट्रीक टन खर्च मर्यादेसाठी  4 हजार प्रति मेट्रीक टन अनुदान मर्यादा आहे. 500 ते 1000 मेट्रीक टन कांदाचाळीसाठी 6 हजार प्रति मेट्रीक टन खर्च मर्यादेसाठी 3 हजार प्रति मेट्रीक टन अनुदान मर्यादा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वत:च्या मालकीची जमीण असणे आवश्यक व 7/12 उताऱ्यावर, स्वत:चे कांदा पिक असणे आवश्यक सदर योजनेचा लाभ वैयक्तीक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था व सहकारी पणन संघ यांना घेता येईल.
योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages