चिंचोलीत गुन्हेगारीच्या दोन घटना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 29, 2025

चिंचोलीत गुन्हेगारीच्या दोन घटना

 चिंचोलीत गुन्हेगारीच्या दोन घटना

महिलेवर सामुहिक बलात्कर केल्यासह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील चिंचोली गावात गुन्हेगारीच्या दोन घटना घडल्या आहेत.महिलेवर सामुहीक बलात्करासह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे परस्पर विरोधी माढा पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.एकुण ११ जणाविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत.

 २५ वर्षीय पिडीत महिलेने माढा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन राजकुमार महादेव लोंढे,दिनेश भिकाजी लोंढे,रोहन दिनेश लोंढे,अन्य अनोळखी 
गाडीचा चालक अश्या चार जणाविरुध्द सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना 19 मे सकाळी १०.३० च्या सुमारास चिंचोली येथील नंदींबाच्या जंगलातील लवणात 100 मिटर अंतरावर घडली.

१९ मे रोजी सकाळी १० वा.च्या सुमारास चिंचोली येथील नंदीबाच्या जंगलातील वळणाजवळ संबधित चौघा आरोपीनी फिर्यादी महिलेच्या तोंडात रुमालाचा बोळा करुन घातला व राजकुमार लोंढे यांचेसह इतर तिघांनी फिर्यादीचे  इच्छेविरुद्ध शरिर संबंध करुन  त्यांनी गाडीमध्ये बसवलेनंतर तलवारी व सतुरांचा धाक दाखवुन कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या नवऱ्याचा काटा काढीन अशी धमकी दिली.
त्यानंतर रोहन दिनेश लोंढे हा तेथे आला व त्याने तु जर माझ्या वडिलांविषयी काही तक्रार करशील तर तुझ्या घराबाराला जिवे ठार मारीन अशी धमकी देऊन गेल्याची फिर्यादीत संबधित पिडीत महिलेने नमुद केले आहे.

तर दुसऱ्या तक्रारीत गावच्या राजकारणाल अडथळा आणतो याचा राग मनात धरुन  राजकुमार महादेव लोंढे  यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद राजकुमार लोंढे यांनी दिल्यानुसार बाजीराव सुभाष लोंढे, अनिल सुभाष लोंढे, केशव सावता देवकर, आदित्य दशरथ चव्हाण, प्रतिक गायकवाड, अमोल धनाजी लोंढे सर्व रा. चिंचोली ता. माढा या सात जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.19 मे रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास चिंचोली गावच्या शिवारात  आर डी एल कंपनीच्या समोर घडली.
लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, हॉकी स्टीक, एस टी पाईप, लोंखडी चैन, तलवार, कोयता या हत्याराने राजकुमार लोंढे आर डी एल कंपनीच्या समोर थांबला असताना संबधित ७ आरोपीनी जिवे मारण्याच्या उद्देशाने एकत्र मोटार सायकलवरुन लोंढे यांच्या जवळ जवळ येवून त्यांचेतील बाजीराव लोंढे हा फिर्यादीचे जवळ येवून तुला लय माज आला आहे, तुला लय गुर्मी आली आहे, तु मंत्रालयात जातो गावच्या राजकारणात अडथळा आणतो काय असे म्हणून तुला आज जिवंत ठेवायचे नाही असे म्हणून शिवीगाळी दमदाटी करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हत्याराने जबर मारहाण करुन गंभीर जखमी करुन संबधित आरोपी पळून निघून गेले.
दोन्ही घटनांचा तपास माढा पोलिस स्टेशनचे स.पो.नी.नेताजी बंडगर करीत आहेत.या दोन्ही घटनांमधील सखोल सत्य समोर येण्याची गरज आहे.तो पोलिस तपासातून येणार का ? हाच खरा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages