कांदलगाव पुलासाठी चार कोटी रुपये मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 23, 2025

कांदलगाव पुलासाठी चार कोटी रुपये मंजूर

 कांदलगाव पुलासाठी चार कोटी रुपये मंजूर



बार्शी (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील कांदलगाव येथील पुलासाठी चार कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती माजी आ. राजेंद्र राऊत यांनी दिली. नुकतेच पालकमंत्री जयकुमार गोरे कांदलगाव येथे पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन समारंभासाठी आले होते. त्यावेळी माजी आ. राऊत यांनी बार्शी ते कांदलगाव रस्त्यावरील राजेंद्र राऊत पूल मंजूर करण्याची मागणी पालकमंत्र्याकडे केली होती. त्यावेळी पालकमंत्री गोरे यांनी पूल मंजूर केल्याचा शब्द राऊत व गावकऱ्यांना दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करत सदर पुलाच्या कामासाठी शासनाच्या वतीने ४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. बार्शी - कांदलगाव - शिरसाव रस्त्यावरील पुलासाठी ४ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या मार्गावरील शेतकऱ्यांची व जनतेची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages