भाजपविरोधात बोलणे म्हणजे देशविरोधात बोलणे : बच्चू कडू
नाशिक (कटूसत्य वृत्त):- भाजप आणि भ्रष्टाचार हे एक समीकरण जोडले जात आहे. भाजप अतिशय खालच्या स्तरावरचे राजकारण करत असून सध्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलणे म्हणजे देशाच्या विरोधात बोलण्यासारखे झाले आहे, अशा शब्दांत प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर 'प्रहार' केला. दिव्यांगांचे अनेक प्रश्न बाकी असून ते सोडवण्यासाठी ८ जूनपासून तुकडोजी महाराज यांच्या समाधिस्थळाशेजारी आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांना प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे धनाजी - संताजी या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आलेले बच्चू कडू हे हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून आले होते. शिवनीतीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी लढावे म्हणून कदाचित कार्यकर्त्यांनी हा घोडा आणला असावा असे त्यांनी सांगितले. लोकांच्या अनेक योजनांचे पैसे मिळत नाहीत. अधिकारी योजनेचे पैसे देण्यासाठी लाच मागतात. मुख्यमंत्री देवेंद्र माजी मंत्री खोतकरांवर टीका धुळे येथील प्रकार भ्रष्टाचाराचाच असल्याचे सांगत कडू यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली. सध्या समितीकडून अहवाल मागवण्यापेक्षा समित्यांचाच अहवाल मागवण्याची वेळ आली आहे. समित्या या प्रशासनावर अंकुश लावण्यासाठी असतात. मात्र सध्या बहुतांश समित्या भ्रष्ट झाल्या आहेत. मंत्र्यांची मालमत्ता पाहिली तर आपल्या राज्याचे वेगळे बजेट होईल अशी अवस्था आहे. जे करप्ट अधिकारी असतात त्यांनाच चांगली खाती दिली जातात.नगरविकास सचिवसाठी १०० कोटी द्यावे लागत असल्याचा आरोपही कडू यांनी केला.फडणवीस म्हणतात, मंत्रालयात येऊ नका.राज्यातील आमदार व मंत्र्यांचा वेतन ५५००० रुपयांवरून ३५०००० लाख रुपये केले अन् ज्यांना हातपाय नाहीत अशा दिव्यांगांना फक्त १५०० रुपये अनुदान दिले जाते. दिव्यांग बांधवांना दरमहा ६००० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी करतानाच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सरकारने बड्या उद्योजकांना दीड लाख कोटींचे कर्ज माफ केले, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी टाळाटाळ केली जात आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास आंदोलनाची धार अधिक करण्यात येईल.
0 Comments