खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचा फलटण तालुका दौरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 27, 2025

खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचा फलटण तालुका दौरा

 खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचा फलटण तालुका दौरा



"अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी"

अकलूज (कटूसत्य वृत्त):- फलटण तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली, तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, शेतीतील उभ्या पिके वाहून गेली,काही घरांची पडझड झाली तसेच काही भागांत ओढा नदी नाले वरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आज राहूरी,बरड,कुरोली,जाधववाडी, गोखळी,
मठाचीवाडी ,गिरवी,निरगुडी,धुमाळवाडी व फलटण शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांची व नागरिकांची भेट घेतली, त्यांच्या समवेत संवाद साधला. खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी स्थानिक प्रशासनाला तत्काळ मदतकार्य राबवण्याचे निर्देश दिले असून, तात्काळ पंचनामे करून घ्यावेत म्हणून प्रशासनाला सुचना केल्या.

यावेळेस सोबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी आ.दीपक चव्हाण,तहसीलदार,स्थानिक ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages