विवेक लिंगराज यांच्या स्मृत्यर्थ रविवारी सुरेल गीतांची मैफिल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 24, 2025

विवेक लिंगराज यांच्या स्मृत्यर्थ रविवारी सुरेल गीतांची मैफिल

 विवेक लिंगराज यांच्या स्मृत्यर्थ रविवारी सुरेल गीतांची मैफिल


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचे माजी कनिष्ठ प्रशासन अधिकारी दिवंगत विवेक लिंगराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवार, दि. 25 मे रोजी सोलापुरात सुरेल गीतांच्या मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजक सुनीता राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
          रविवार दि. 25 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. विवेक लिंगराज यांचे तीन महिन्यांपूर्वी हैदराबाद रोड अपघाती निधन झाले होते. विविध संघटनांच्या माध्यमातून ते जिल्हा परिषदेतील कर्मचात्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असत. त्यांच्या जाण्याने जिल्हा परिषदेतील हजारो कर्मचात्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या सुरेल गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
        सुनिता राठोड प्रेजेंट्स या कार्यक्रमात ऑल इंडिया रेकॉर्ड केलेले मोहम्मद हुंडेकरी, मयूर पवार, सुभाष चव्हाण, बासंती लोणी, जगदीश मेटकरी आणि जूनियर गोविंदा यांची कला आणि गायन सादर होणार आहे.
         या पत्रकार परिषदेस अवनिश लिंगराज, विजयकुमार लिंगराज, विक्रमकुमार लिंगराज, विश्वजीत लिंगराज आणि मोहम्मद हुंडेकरी हे उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages