Hot Posts

6/recent/ticker-posts

कंत्राटदारांचे विविध प्रश्न नक्कीच सभागृहात मांडू- अंबादास दानवे

 कंत्राटदारांचे विविध प्रश्न नक्कीच सभागृहात मांडू- अंबादास दानवे



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना चे अध्यक्षा मिलिंद भोसले यांनी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे भेट घेतली याबाबत सविस्तर त्यांच्या बरोबर संभाषण ही झाले,तसेच त्यांनी आपुलकीने राज्यातील कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे देयके देण्याबाबत शासनाकडून काही काय प्रगती झाली का असे विचारले! तसेच मागील काळात ज्या प्रमाणे संघटनेचे राज्य पातळीवर देयके मिळणे,कामांचे विकेंद्रीकरण,निधीचे असमतोल वाटप ! शासनाकडून निधी नसताना काम सुरू करण्यासाठी कंत्राटदार कडे तगादा लावणे, दंडात्मक नोटीस देणे, आधिकारी यांची दमदाटी यांसारख्या विषयांवर चर्चा केली आहे. तसेच आपले सर्व‌ महत्त्वाचे मागण्या यावेळी आपण नक्कीच सभागृहात मांडू असे आश्वासन आपणास दिले, तसेच यासाठी त्यांनी महत्त्वाचे म्हणजे यासाठी आमच्या बरोबर हस्तांदोलन करून आम्ही आपल्या सोबत आहोत असे ग्वाही दिली आहे. हे महत्त्वाचे आहे यावेळी राज्य अभियंता संघटना चे राज्य संघटक इंजि नरेंद्र भोसले हे उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments