ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं खा सुनेत्रा पवार यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 27, 2025

ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं खा सुनेत्रा पवार यांचा सत्कार

 ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं खा सुनेत्रा पवार यांचा सत्कार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा अजित पवार वहिनी यांचे केंद्र सरकारच्या महिला सशक्तिकरण विषयक संसदीय समितीवर निवड झाल्यानिमित्त ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ईच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी खासदार सुनेत्रा वहिनी यांना शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाअध्यक्षा वर्षाराणी शिंदे, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक सुरेश पालवे, सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, शहर सरचिटणीस संतोष गायकवाड,महादेव राठोड, आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी विठ्ठल रुक्माईची मनोभावे दर्शन घेतले.दरम्यान राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार हे संपूर्ण महाराष्ट्र सह विविध राज्याचा दौरा करीत आहेत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना शिक्षण आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करण्याचे दृष्टीने त्यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण होता. मागील वीस वर्षापासून महिला सबलीकरण व महिलांच्या आर्थिक विकासासाठी खासदार सुनेत्रा पवार हे कार्यरत आहेत महिला सशक्तिकरण ही एक महत्त्वाची संसदीय समिती आहे जी महिलांच्या हक्क कल्याण आणि सशक्तिकरणाशी संबंधित मुद्द्यावर काम करते याच संसदीय समिती मध्ये खासदार सुनेत्रा पवार यांचे निवड झाल्यानिमित्त ईच्छा भगवंताची परिवाराच्यावतीनं त्यांचं विशेष सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास किसन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा अशा सूचना देखील यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी किसन जाधव यांना दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages