मारहाण केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, May 28, 2025

मारहाण केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता.

 मारहाण केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता.

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- दि. 30/04/2020 रोजी सकाळी आरोपी श्रीकांत दिगंबर दरेकर यांनी आपल्या आईस दारू पिण्यासाठी पैश्याची मागणी केली असता विळयाने मारून गंभीर जखमी केले म्हणून तालूका पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती. दोषारोपपत्र मे. कोर्टात दाखल करण्यात आले हाते त्याकामी सदर खटल्याची सुनावणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पी. व्ही चव्हाण साहेब यांच्या समोर झाले असता फिर्यादींनी सरकार पक्षाच्या कथनास दुजोरा दिला नाही फिर्यादी जबाब व घटनास्थळचा पुरावा हा वस्तुस्थितीजन्य व दुय्यम प्रतीचा आहे. त्यामुळे आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द होऊ शकत नाही असा युक्तिवाद केला असता तो मे. कोर्टाने ग्राहय धरून आरोपीची निर्दोष मुक्तता केली यात आरोपी तर्फे ॲड लक्ष्मण महादेव बनसोडे यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages