बार्शीत मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली अडकली एसटी बस, 27 प्रवाशांची सुखरूप सुटका
बार्शी (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या बार्शी येथील एक गंभीर घटना घडता घडता टळली. मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस अडकली. (२६ मे) रोजी मुसळधार पाऊस राज्याच्या अनेक भागांमध्ये पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली. पुण्याच्या बारामती तालुक्यात तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने पूर स्थिती निर्माण झाली. बारामती शहरातील नीरा डावा कालवा फुटल्यामुळे पाणी प्रचंड वेगाने पालखी महामार्गावर आले आणि काटेवाडी-भवानीनगर रस्ता बंद करण्यात आला. या भागातील दीडशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं असून, अनेक कुटुंबांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
आता सोमवारी पडलेल्या पावसामुळे सोलापूरच्या बार्शी येथील एक गंभीर घटना घडता घडता टळली. मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस अडकली. बार्शी शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर रेल्वे पुलाखाली ही बस अडकली. पाण्याचा स्तर वाढत गेल्याने बसमध्ये पाणी शिरले आणि ती बंद पडली. सुदैवाने, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व २७ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
ही बस तुळजापूरहून बार्शीकडे जात होती. मात्र, पुलाखाली साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने बस अडकली. काही वेळातच बसमध्ये पाणी शिरू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बसच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने ती पूर्णपणे बंद पडली. यानंतर काही वेळ तुळजापूर – बार्शी रोडवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.
बार्शी पोलीस व अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेऊन सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. बस मध्ये २७ प्रवाशी बसमधे होते. त्यांना सुकक्षित रित्या बाहेर काढण्यात आले. त्यांच्या या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
0 Comments