जि. प. कडे १९ हरकती प्राप्त
प्रारूप प्रभाग रचनेवर विभागीय आयुक्त घेणार सुनावणी
सोलापूर : (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर जिल्हा प्रशासनाकडे १९ हरकती प्राप्त झाल्या असून, या हरकती जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविल्या आहेत. त्यावर विभागीय आयुक्त ४ ऑगस्ट रोजी रोजी सुनावणी घेणार आहे. ज्या गट आणि गणाविरोधात हरकती आहेत, त्या गावांची भौगोलिक माहिती. लोकसंख्या यासह इतर माहिती घेण्याची काम प्रशासन करीत आहे. विभागीय आयुक्तांसमोर प्रशासकीय बाजू मांडताना लागणारी सर्व माहिती एकत्रित केले जात आहेत. सर्व गट, गण तसेच संबंधित तालुक्याचा नकाशा पाहून हरकतदारांचीही बाजू समजावून घेतली आहे. हरकतदारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर विभागीय आयुक्त ११ ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय देणार आहेत. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. ज्यांनी हरकत घेतली आहे, त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहणे गरजेचे आहे. तशी नोटीस संबंधितांना पाठवत असल्याचे महसूल उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले.
चौकट
विविध हरकती प्राप्त, सुनावणी प्रक्रिया
करमाळा तालुक्यातील विहाळ गाव वीट जिल्हा परिषद गटातून कमी करून झरे गावात समावेश करा, अशी हरकत गणेश चिवटे यांनी घेतली आहे. विहाळ हे गाव कोर्टी गणात समावेश करून पिंपळवाडी
व करमाळा ग्रामीण भागातील गावे वगळावे, अशी मागणी संजय जाधव यांनी केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तोगराळी हे गाव वळसंगमधून काढून कुंभारी गटात समावेश करा, अशी मागणी
इंद्रजीत लांडगे यांनी केली आहे. दक्षिणमधील राजूर या गावाचा औराद पंचायत गणात समावेश करा, अशी मागणी सोमलिंग देवकते यांनी केली आहे. उत्तर सोलापूरमधील खेड हे गाव कोंडी गटामध्ये समावेश न करता बीबी दारफळ गटात समावेश केल्याबद्दल सोमनाथ काळे यांनी हरकत घेतली. माळशिरस तालुक्यातील दहिगाव गट रद्द करून मोरोची गटाची निर्मिती करावी, अशी हरकत महेश थिटे यांनी घेतली आहे.
0 Comments