Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिकेचे रुग्ण खासगी रुग्णालयात

 महापालिकेचे रुग्ण खासगी रुग्णालयात

वळविल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना नोटीस

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-   महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात वळविण्याचा प्रयत्न आशा वर्कर्सकडून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी दोन खासगी डॉक्टर्सना नोटीस बजावण्यात आली आहे. तर संबंधित आशा वर्कर्स यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. याप्रकरणी नवी पेठेतील श्रेयस हॉस्पिटलचे सुमित सुरवसे आणि श्रद्धा सुरवसे यांना रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. चार दिवसात त्याचा खुलासा देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

शहरातील सरकारी प्रसूतिगृहांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात वळविणारी एक टोळी सक्रिय आहे. या टोळीने आशा वर्कर यांना विविध आमिषे दाखवून एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमधील काही आशा वर्कर्सकडून महिला रुग्णांना खासगी रुग्णालयाकडे वळविण्याचा प्रयत्न झाला आहे. या संदर्भात माहिती मिळताच महापालिका आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईतून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यानुसार डॉ. सुमित सुरवसे आणि श्रद्धा सुरवसे यांना नोटीस बजावली आहेत. त्यांचा खुलासा समाधानकारक नसेल तर त्यांची वैद्यकीय मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करणार येणार आहे. यात सहभागी असलेल्या आशा वर्कर्स यानांही नोटिसा देण्यात येणार असल्याचेही आरोग्य विभागाने

स्पष्ट केले.


चौकट 1

 नियमबाह्य गर्भपात केल्याची प्राथमिक माहिती

महापालिकेतील प्रसूतीगृहाकडील रुग्ण खासगी नर्सिंग होमकडे पाठविल्या

प्रकरणाबरोबरच नियमबाह्य गर्भपात केल्याची प्राथमिक माहितीही प्राप्त झाली असल्याचे

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले. संबंधित नर्सिंग होमची तपासणी

करण्यात आली. यामध्ये काही आशा वर्कर्सना काही रक्कम ट्रान्सफर केल्याचेही दिसत

आहे. या संदर्भात आरोग्य विभागामार्फत प्राथमिक अहवाल तयार करण्यात येत आहे.

गर्भपात संदर्भात माहिती पुढे आल्याने कायदेशीर सल्ला घेऊन फौजदारी कारवाई करण्यात

येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

चौकट 2

३० आशा वर्कर्सवर

कारवाई होणार

महापालिकेच्या एकूण ४०० आशा

वर्कर आहेत. त्यापैकी २९४ आशा वर्करचा

एक व्हाट्सअप ग्रुप आहे. त्यापैकी २५ ते

३० आशा वर्कर्सचा या प्रकरणाशी संबंध

असल्याचा संशय आहे. या सर्वांवर

महापालिका उपायुक्त आशिष लोकरे

यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई

करण्यात येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments