Hot Posts

6/recent/ticker-posts

स्व. गणपतराव देशमुख यांचा विचार टिकवून ठेवू

 स्व. गणपतराव देशमुख यांचा विचार टिकवून ठेवू



सांगोला येथील स्मृतीस्थळी हजारोंच्या साक्षीने पुष्पवृष्टी करून अभिवादन; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती
सांगोला (कटूसत्य वृत्त):-   माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांनी गोरगरीब, कष्टकरी,
शेतकरी, शेतमजूर, दलित, वंचित घटकांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी
विधिमंडळात मांडून न्याय दिला आहे. त्यांच्या विचारानुसार आज लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने मला
निवडून दिले हे सर्व पाहण्यासाठी आज ते हवे होते. त्यांनी दिलेला विचार टिकवण्याची जबाबदारी
आमच्यावर आणि आपणा सर्वांवर आहे. तो विचार आम्ही भविष्य काळात टिकून ठेवू असे प्रतिपादन
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले.
पुण्यस्मरण दिनानिमित्त हजारोंच्या करण्यात आला. तसेच आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख यांनी आपल्या कुटुंबासमवेत पुष्पगुच्छ पुष्पचक्र अर्पण केले.
 यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, रामहरी रुपनवर, पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, प्रा.पी.सी. झपके, ज्येष्ठ नेते तानाजी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, सागर पाटील, अॅड. यशराजे साळुंखे पाटील, मोहोळचे अजिंक्यराणा पाटील, जीवन उत्तमराव जानकर, ब्रह्मानंद पडळकर, चेतनजी नरोटे, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन समाधान पाटील, माजी साक्षीने स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या समाधीस्थळी पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी श्रीमती रतन गणपतराव देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण सहाय्यक पोलीस आयुक्त भरतअण्णा शेळके, सांगोला सुतगिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, आनंदा माने, सचिन लोखंडे, प्रमोद साळुंखे पाटील, श्रीकांत देशमुख, संतोष देवकते, सुरेश माळी, अॅड. सचिन देशमुख, डॉ. सुनील लवटे, डॉ. निरंजन केदार, माजी सभापती गिरीश गंगथडे, काशिलिंग गावडे, सूर्यकांत मेटकरी, अवधूत कुमठेकर, नंदकुमार यादव, शिवाजी शेजाळ, सरपंच दत्तात्रय बेहरे, सोमनाथ शिंदे, पोपट गडदे, माऊली हळणवर, सोमनाथ आवताडे, नागेश फाटे, बयाजी लवटे यांच्यासह प्रांताधिकारी भैरवनाथ माळी, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार संतोष कणसे, मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव आदींनी अभिवादन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments