स्वातंत्र्यसैनिक कॉ. नारायणराव आडम यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ. नारायणराव आडम यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही कॉ. नारायणराव आडम प्रबोधन केंद्राच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात श्रमिक, कष्टकरी, तरुणाई आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचा जागरूकतेचा संदेश दिला.
या शिबिराचे आयोजन बुधवार, दि. ३० जुलै रोजी लाल बावटा मध्यवर्ती कार्यालय, दत्त नगर आणि कॉ. गोदुताई परुळेकर नगर, कुंभारी येथे करण्यात आले होते. शिबिराची सुरुवात ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या हस्ते कॉ. नारायणराव आडम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
कार्यक्रमाला कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. नसीमा शेख, कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. कामिनिताई आडम, कॉ. एम. रफिक शेख, कॉ. कुर्मय्या म्हेत्रे, कॉ. शेवंताताई देशमुख, डॉ. किरण आडम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी संस्थेचे सचिव कॉ. एम.एच. शेख यांनी सांगितले की, “कामगार चळवळीप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपणे ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. अनेकदा नागरिकांना आरोग्याच्या संकटात रक्ताची अत्यंत गरज भासते. अशा वेळी गरजूंना वेळेवर रक्त मिळावे यासाठी समाजात रक्तसाठा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. स्व. कॉ. नारायणराव आडम यांच्याकडून आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली की, समाजासाठी कार्य करताना प्रत्येक कार्यकर्त्याने आपली निस्वार्थ सेवा द्यावी.”
या रक्तदान शिबिरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय, बोल्ली ब्लड बँक, सिद्धेश्वर ब्लड बँक व मल्लिकार्जुन ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे संचालक मंडळ, जनवादी महिला संघटना, सिटू, SFI, DYFI या जनसंघटनांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments