मोहोळ येथे महसूल सप्ताहाचे आयोजन
मोहोळ,(कटूसत्य वृत्त):-
महाराष्ट्र शासनाच्यावतीने साजरा करण्यात येणाऱ्या महसूल दिनानिमित्त महसूल आणि वन
विभागामार्फत १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह २०१५ राज्यभर साजरा करण्यात
येणार आहे. मोहोळ तहसील कार्यालयामार्फतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा व कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे शासकीय कामकाजातील पारदर्शकता वाढवणे तसेच जनतेचा शासनावरील विश्वास वृद्धिंगत करणे असा असून या उपक्रमाचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सचिन मुळीक यांनी केले आहे.
सप्ताहात खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. १ ऑगस्ट महसूल दिन साजरा व उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी सत्कार, कार्यरत असलेल्या सेवानिवृत झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढणे.
२ रोजी शासकीय जमिनीवरील २०११. पूर्वीच्या रहिवासी अतिक्रमणांचे नियमांनुसार पट्टे वाटप ३ रोजी पानंद व शेतरस्ते मोजणी, अतिक्रमण निर्मूलन व वृक्षारोपण, ४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडलनिहाय राबविणे. ५ रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे. ६ रोजी- शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निर्मूलन व शर्तभंग प्रकरणे निकाली काढणे. ७ रोजी एम शेडचोरणाची अंमलबजावणी व समारोप एम समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुळीक यांनी केले आहे.
0 Comments