शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; पक्षातील अंर्तगत गटबाजीला कंटाळून सावंतानी दिला राजिनामा
पक्षश्रेष्ठींचा विश्वास नसल्याचे कारण; शिवसेनेत खळबळ
माढा (कटूसत्य वृत्त):- शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती माढा येथे त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पाठवून दिलेल्या राजीनामा पत्रात पक्षश्रेष्ठींचा आपल्यावर विश्वास राहिला नसल्याने पदाचा राजीनामा देत मी पदमुक्त होत असल्याचे जाहीर करुन मी साधा शिवसैनिक म्हणुन माढा तालुक्यात काम करत राहणार असल्याचे म्हटले आहे.
मी जिल्हा संपर्कप्रमुख असून देखील मला विश्वासात न घेता व न सांगता जिल्ह्यातील देखील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर माझ्या माढा तालुक्यातील तालुकाप्रमुख व शहर प्रमुख यांच्याही नियुक्त्या केल्या आहेत.पक्षश्रेष्ठींचा विश्वास नसल्यामुळे मी या पदाचा राजीनामा सविनय सादर करीत आहे व यापुढे मी एक बाळासाहेबांच्या विचाराचा व आनंद दिघे साहेब यांचा सहवास लाभलेला शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे प्रा.सावंत यांनी स्पष्ट केले.मागील अनेक दिवसांपासून जिल्हात शिंदे सेनेत गटबाजी असल्याचे दिसत होते.अखेर सावंतानी राजिनामा दिल्याने गटबाजीतुन राजिनामा झाल्याचे आधोरेखीत झाले आहे.सावंतानी कुणाचे ही नाव घेऊन टीका करणं टाळले आहे.यावेळी शिवसेनेचे मुन्ना साठे, कुर्डूवाडीचे माजी उपनगराध्यक्ष संजय टोणपे,माजी नगरसेवक युसूफ दाळवाले,शिवराज पवार,धर्मराज मुकणे, बालाजी बारबोले, महेश मोहळे,आदी सह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
चौकट :- राजकीय भुमिकेकडे लक्ष-प्रा.सावंत हे जिल्हातील मातब्बर नेते मंडळी पैकी एक असून सावंतानी राजिनामा दिल्याने हा शिंदे सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निदर्शनास आणून देखील त्याची दखल घेतली नसल्याने राजिनाम्याचे पाऊच उचलले असल्याचे सावंतानी सांगितले.सावंतानी जरी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार असल्याचे सांगितलेले असले तरी शिवाजीराव सावंत पक्षात नाराज झाल्याचे एकदंरीत त्याच्या देहबोलीतुन स्पष्टपणे दिसले.त्यामुळे सावंत वेगळी राजकीय वाट धरतील की पक्षाचे नेते त्यांची व्यथा जाणून समझोता घालतील.हे येत्या काळातील
सावंताच्या राजकीय भुमिकेतून स्पष्ट होईल.याकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.
चौकट-2 :- कोण आहेत शिवाजीराव सावंत -
सावंत हे जिल्हातील मातब्बर नेते असून आमदार तानाजी सावंत यांचे सख्खे बंधु आहेत.त्यांनी दोन वेळा माढा विधानसभेची निवडणुक लढवली आहे.निष्ठावान शिवसैनिक म्हणुन त्यांची ओळख आहे.एकेकाळी
सायकल वरुन त्यांनी सेनेचे काम केले.सोलापूर जिल्हा परिषदेचे त्यानी जि.प.सदस्य आणी विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहिले आहे.जिल्हा संपर्क प्रमुख पदावर शिवाजीराव सावंत मागील तिन वर्षापासून कार्यरत होते.
भैरवनाथ शुगरचे व jspm शिक्षण संस्थेचे ते चेअरमन आहेत.
चौकट-2 :- मला पदाधिकारी निवडताना कसलेही
विश्वासात घेतले जात नव्हते.मी ही बाब अनेक वेळा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसह अन्य वरिष्ठ नेते मंडळीच्या भेटी घेऊन निदर्शनास आणून दिले आहे.मात्र यावर कसलीही कार्यवाही झालेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मी माझ्या पदाचा राजीनामा पाठवला आहे.एक शिवसैनिक म्हणून माढा तालुक्तात काम करीत राहील-प्रा.शिवाजीराव सावंत,शिवसेना नेते
0 Comments