माजी आ. मानेंच्या प्रयत्नाने कापसे कुटुंबीयांना मिळाली मदत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 29, 2025

माजी आ. मानेंच्या प्रयत्नाने कापसे कुटुंबीयांना मिळाली मदत

 माजी आ. मानेंच्या प्रयत्नाने कापसे कुटुंबीयांना मिळाली मदत



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे महावितरणची तार अंगावरुन पडून मृत झालेल्या श्रेया धनंजय कापसे या चिमुकलीच्या कुटुंबाला माजी आमदार यशवंत माने यांनी चार लाखांची मदत मिळवून दिली.

शेतात खेळत असताना महावितरणच्या मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून श्रेयाच्या अंगावर पडून ती पूर्ण भाजली गेली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने टाकळी सिकंदर येथील माजी पंचायत समिती सदस्य माऊली चव्हाण, सिराज तांबोळी, सरपंच तुकाराम चव्हाण, हर्षल बनसोडे, प्रशांत बचुटे यांनी श्रेयाच्या उपचारासाठी ३८ हजार रुपयांची मदत रक्कम संकलित केली. मात्र ती मदत तुटपुंजी ठरली. तत्कालीन आमदार यशवंत माने यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी कापसे कुटुंबीयांची भेट घेतली.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील त्रुटी काढून मदत देता येत नसल्याची भूमिका घेतली होती. माजी आमदार माने यांनी श्रेयाच्या मृत्यूबाबत थेट विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याची दखल घेतली गेल्याने अखेर श्रेयाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला व तिच्या कुटुंबीयाला चार लाखांची मदत मंजूर झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages