निवृत्त पोलीस अधिकारी रमेश मोहिते यांचे निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 29, 2025

निवृत्त पोलीस अधिकारी रमेश मोहिते यांचे निधन

 निवृत्त पोलीस अधिकारी रमेश मोहिते यांचे निधन

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-इतिहास अभ्यासक अमोल मोहिते यांचे वडील, निवृत्त पोलीस अधिकारी रमेश महादेवराव मोहिते (वय 83) यांचे वृद्धापकाळाने आज गुरुवार दिनांक 29 मे रोजी दुपारी 11  वाजून 32 मिनिटांनी निधन झाले.

रमेश मोहिते यांनी पोलीस सबइन्स्पेक्टर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर ते आपल्या कार्य शैलीमुळे डीएसपी पदापर्यंत पोहोचले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी चिनी भाषेचा प्रसार आणि प्रचार केला. रामलाल चौकातील डॉ. द्वारकादास कोटणीस यांच्या स्मृतिभवनात ते चिनी भाषेचा वर्ग घेत असत. चिनी भाषेचे शिक्षक म्हणून त्यांनी सेवानिवृत्तीनंतर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी स्वतःच्या हाताने श्री स्वामी समर्थांच्या पोथी चे लिखाण केले आहे. चिनी भाषेची पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अमोल, मुली आशा व सीमा, सून, नातू नातनातवंडे असा परिवार आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. सर्वांशी मिळून मिसळून वागणे सर्वांना मार्गदर्शन करणे ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारे व्यक्तिमत्व पडद्याआड गेले आहे. त्यांच्या पार्थिव देहावर सायंकाळी 6 वाजता मोदी खाना स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages