सांगोल्यात कोसळला ८०० किलो वजनाचा टेलिस्कोप: जीवितहानी नाही, कारचे नुकसान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 1, 2025

सांगोल्यात कोसळला ८०० किलो वजनाचा टेलिस्कोप: जीवितहानी नाही, कारचे नुकसान

 सांगोल्यात कोसळला ८०० किलो वजनाचा टेलिस्कोप: जीवितहानी नाही, कारचे नुकसान





सांगोला (कटूसत्य वृत्त):- हैदराबाद येथून टाटा मूलभूत संशोधन केंद्राने खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सोडलेला ८०० किलो वजनाचा टेलिस्कोप (दुर्बीण) पॅराशूटसह रविवारी सकाळी सहाच्या सुमारास अचानक सांगोला शहरातील मानवी वस्ती पडल्याने एकच खळबळ उडाली.

अचानक वाऱ्याची दिशा बदलामुळे हे उपकरण मानवी वस्तीत कोसळले असले तरी यामुळे जीवितहानी मात्र झाली नाही. एका कारचे मोठे नुकसान झाले.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फांडामेंटल रिसर्च सेंटर (टीआयएफआर) बलून फॅसिलिटी नॅशनल सेंटर ऑफ गर्व्हमेंट ऑफ इंडिया शाखा हैदराबाद या संशोधन केंद्राकडून अवकाशातील ताऱ्यांची नोंद घेण्यासाठी शनिवार रात्री ९ च्या सुमारास पॅराशूट व बलूनच्या सहकार्याने टेलिस्कोप (दुर्बीण) अवकाशात २५ कि.मी. अंतरावर सोडले होते.

या टेलिस्कोपच्या माध्यमातून रात्रीत ताऱ्यांचा अभ्यास करणे, त्याच्या नोंदी ठेवणे हे काम पूर्ण केले जाते. त्याप्रमाणे सदरचा प्रोजेक्ट पूर्ण झाला. परंतु पहाटे सहाच्या सुमारास हा बलून कट करून पॅराशूट मशिनसह खाली उतरविण्याचा प्रयत्न सुरू असताना हवामानात बदल व वाऱ्याची दिशा बदलल्याने सांगोला शहराजवळ असलेल्या खारवटवाडी येथे पडले. तर त्यानंतर ओपन झालेले बलून टेलिस्कोप (दुर्बीण) मशिनसह शहरातील खडतरे गल्लीत मनुष्य वस्तीत लिंबाच्या झाडावर क्रॅश होऊन झाडाखाली असलेल्या कारवर कोसळले.

गुढी उभारण्याच्या वेळेतच टेलिस्कोप कोसळल्याने गोंधळ

रविवारी गुढीपाडवा असल्याने सूर्य उगवण्याच्या अगोदर गुढी उभी करण्याची सर्वांचीच धावपळ सुरू होती. त्या अगोदरच सकाळी लवकर ही दुर्बीण शहराच्या मध्यवर्ती भागात कोसळल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. याबाबत चर्चा, तर्क याला उधाण आले होते. परंतु सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे त्यांच्या सहकार्यांनी येऊन त्यावर असलेल्या फोननंबरवरून संपर्क साधत त्या संशोधन केंद्राला घडलेली घटना सांगितली. संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी येऊन त्या उपकरणाची पाहणी केली व पोलिस स्थानकामध्ये याबाबत सविस्तरपणे माहितीही दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages