Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यातल्या धरणांत पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला. फक्त 47.74 टक्के जलसाठा

 राज्यातल्या धरणांत पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला. फक्त 47.74 टक्के जलसाठा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उन्हाच्या झळा जसजशा वाढत चालल्या आहेत त्याचबरोबर राज्यातल्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला आहे. दोन आठवड्यांपूर्वी 50 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा आता 47 टक्क्यांवर आला आहे.

त्यामुळे लवकरच पाणी पुरवण्याचे नियोजन करावे लागणार आहे अशी चिन्हे आहेत.

राज्यात 2 हजार 997 धरणे आहेत. उन्हाळ्याच्या झळा वाढण्यास सुरुवात होताच जलसिंचन विभागाने दररोज पाण्याच्या साठ्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार शनिवारी राज्यातल्या धरणातील पाणीसाठा 47.47 टक्क्यांवर आल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणांतील पाणीसाठा 40.16 टक्के होता.

पैठण (जायकवाडी) – 54.95टक्के, कोयना – 53.51 टक्के, धोम -44.67 टक्के, उजनी (सोलापूर) – 28.26 टक्के, बारवी – 49.62 टक्के, तिलारी – 38.27 टक्के, नीरा देवधर – 18.77 टक्के, पवना – 40.49 टक्के, पानशेत – 46.73 टक्के, मुळशी टाटा – 47.67 टक्के.
Reactions

Post a Comment

0 Comments