Hot Posts

6/recent/ticker-posts

बीबीए व बीसीए अभ्यासक्रमासाठी कार्यशाळेचे आयोजन

  बीबीए व बीसीए अभ्यासक्रमासाठी कार्यशाळेचे आयोजन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आजच्या वेगाने बदलणाऱ्या आणि तंत्रज्ञानाधिष्ठित युगात शिक्षण क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांबरोबरच व्यवसाय आणि तंत्रज्ञान या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देणारे अभ्यासक्रम अधिक लोकप्रिय होत आहेत. त्यामध्ये बीबीएआणि बीसीए हे दोन अभ्यासक्रम विशेष महत्त्वाचे मानले जातात.बीबीए अभ्यासक्रम व्यवस्थापन, नेतृत्व, विपणन आणि उद्योजकता यांसारख्या कौशल्यांवर भर देतो, तर बीसीए अभ्यासक्रम संगणक विज्ञान, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रॅमिंग यासारख्या तांत्रिक क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्याची दिशा दाखवतो. बीबीए व बीसीए अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेसंदर्भातील शंका व परीक्षेची भीती दूर व्हावी, यासाठी संगमेश्वर महाविद्यालयाच्यावतीने १५  ते २५ एप्रिल या कालावधीत दररोज सकाळी १० ते १२ यावेळेत संगमेश्वर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी  बीबीए व बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (MAH-B.BBA/BCA/ BBM/BMS/MBA  Integrated/MCA Integrated CET 2025 ) ही प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन  यांच्यातर्फे २९,३० एप्रिल  आणि २ मे २०२५ रोजी राज्यस्तरीय बीबीए व बीसीए  अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे. सीईटी परीक्षेचे स्वरूप व त्यासाठी लागणारी पूर्वतयारी कशी करावी, यासंदर्भात कार्यशाळेत इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग, जनरल नॉलेज अॅन्ड अवेरनेस, कॉम्प्युटर बेसिक्स आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक मोफत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संगमेश्वर महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा.बमनिंग बुक्का ९५०३३३ ७२२७ प्रा.गौरव जुगदार ९८९० ३५ ५३ ३१  यांच्याशी संपर्क साधावा.

बीबीए आणि बीसीए हे दोन्ही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आधुनिक जगाच्या गरजेनुसार कौशल्य देतात. व्यवस्थापन किंवा संगणक विज्ञान या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहेत. योग्य मार्गदर्शन, परिश्रम आणि आवड असल्यास हे दोन्ही अभ्यासक्रम उज्वल भवितव्य घडवू शकतात.

Reactions

Post a Comment

0 Comments