शिक्षक सहकार संघटना यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान
माळशिरस (कटूसत्य वृत्त):-शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य शाखा माळशिरस यांच्या वतीने आदर्श शिक्षक आणि कला व क्रिडा क्षेत्रात जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षकांचा सन्मान माढा लोकसभा मतदार संघाचे खा. धैर्यशिलभैय्या मोहिते मोहिते पाटील, सहकार शिक्षक संघटनेचे राज्य्यक्ष संतोष पिट्ठलवाड, राज्य समन्वय परचंडे सर, विस्ताराधिकारी सुषमा महामुनी मॅडम आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाध्ये समूह गीत गायन व उत्कृष्ट हार्मोनिअम वादक म्हणून इस्लामपूर केंद्रातील जि. प. प्राथ.शाळा, शेरीवस्ती शाळेचे तालुस्तरीक आदर्श शिक्षक संतोषकुमार हरी महामुनी यांना उत्कृष्ट समूहगीत गायनआणि उत्कृष्ट हार्मोनिअम वादक म्हणून उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जय विजय प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून दिला गेलेला सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने दिला जाणारा तालुका स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार, आणि आजचा शिक्षक सहकार संघटनेचा पुरस्कार आपल्या आदर्श कर्तृत्वाने आणि सर्वांच्या मार्गदर्शनाने हा सन्मान प्राप्त झाला . या सन्मान प्रसंगी आपल्या केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख बापू हाके साहेब, इस्लामपूर केंद्रातील माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. सन्माननीय केंद्रप्रमुख हाके सर आणि केंद्रातील सर्व, शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने हा सन्मान मला मिळाल्याचे महामुनी सर यांनी सांगितले. आजपर्यंत सर्वांच्या सहकार्याने जि. प. शाळा , शेरीवस्ती (इस्लामपूर)शाळेने तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर पुरस्कार मिळाल्याचे महामुनी सर यांनी सांगितले.
0 Comments