Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रहारचे आ. सुभाष देशमुखांच्या घरासमोर आंदोलन

 प्रहारचे आ. सुभाष देशमुखांच्या घरासमोर आंदोलन

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-११ एप्रिल २०२४ रोजी रात्री ९ वाजता शेतकरी कर्जमाफी,पेरणी ते कापणीपर्यंत खर्च एमआरईजीएस मधून करणे, दिव्यांग बांधव यांना ६ हजार रूपये मासिक मानधन देण्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठविणेबाबत दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष  देशमुख यांच्या घरासमोर महिला हॉस्पिटल ते त्यांच्या घरापर्यंत चालत जाऊन अनोख्या पध्दतीने 'टेंभा' आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या-त्या पक्षाची निवडणुक जाहिरनाम्याव्दारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते. आम्ही निवडुन आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये बुडालेला आहे. महाराष्ट्रात दिवसाला ७ शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्या नुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिध्द झालेले आहे. अशी परिस्थिती असतांना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत. अशी जनतेला साद घालुन निवडुन आलेले आमदार महोदय कर्जमाफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही. अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भुमिका घेत नाही. यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवय्या व्यक्तीचा महाराष्ट्र आहे. एप्रिल महिन्यामध्ये ११ एप्रिल ही शेतकऱ्याचा आसुड लिहिणारे शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती. तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करुन देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा व छत्रपतींचे नाव घेवुन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असतांना त्याच्या  कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेवुन आम्ही सर्व कार्यकर्ते मा. बच्चूभाऊ कडू, प्रहार जनशक्ती पक्ष, संस्थापक अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात १) शेतकरी कर्जमाफी २) पेरणी ते कापणीपर्यंत खर्च एमआरईजीएस मधून करणेबाबत, ३) दिव्यांग बांधव यांना ६००० रूपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्यांबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवून शेतकरी व गोरगरीबांना न्याय मिळवून द्यावा असे सांगितले.

सदर आंदोलनावेळी हे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के-पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी रूग्णसेवक बाबा मिस्त्री, फैसल सालार, मनोहर दोंतुल, बक्त्यार शेख, रफिक इनामदार, मोहसीन खान, निरंजन ख्याडे करमाळा, जाफर सय्यद, फेरोज शेख, सादिक देवणी, अयाज बांगी, फेरोज पठाण, उस्मान नदाफ, अमजदखान पठाण, आदिल शेख, अतिक शेख, उजेब इनामदार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments