Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांतीचे लाक्षणिक उपोषण

 शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांतीचे लाक्षणिक उपोषण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-संपूर्ण कर्जमाफीसह शेतीसाठी दिवसा १२ तास वीजपुरवठा करावा, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे थकीत ऊस बील १५ टक्के व्याजासह मिळावे, सोयाबीनला प्रति क्विटल ६ हजार रुपये दर द्यावा, कांद्याला प्रति क्विंटल ४ हजार रुपये दर मिळावा, राज्यशासनाने निवडणूकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली अश्वासने पूर्ण करावीत आदी मागण्यांसंदर्भात रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष अमोल वेदपाठक, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हणमंत गिरी, जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा सरचिटणीस रमेश भंगे, महेश कोरे, दिगंबर ननवरे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments