Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी संलग्नित महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

 लोकमंगल कृषी संलग्नित महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय व लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.पी एन शेंडगे (संशोधन उपसंचालक,  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी) व प्रा. अनंत शेरखाने (विद्याप्रतिष्ठान कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती) हे लाभले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन व लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन फुगे, प्रा. स्वप्नील कदम, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. सायली बडेकर, प्रा. स्मिता धायगुडे तसेच महाविद्यालयातील सर्व विदयार्थी उपस्थित होते. प्रा. अनंत शेरखाने यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले जयंती साजरी करण्यामागील उद्देश सांगितला. प्रा. पी एन.शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा ज्योतीबा फुले यांचे जीवचरित्र अंगीकारले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला. प्राचार्य डॉ सचिन फुगे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य, त्यांनी केलेला त्याग व स्त्रीशिक्षण चळवळीतील त्यांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोतातून महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनकार्य विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली सोनावणे व आभारप्रदर्शन आरती खूने यांनी व्यक्त केले.
Reactions

Post a Comment

0 Comments