शिक्षक बांधवानी टाकाऊ पासून टिकाऊ हा उपक्रम राबवावा : खा. धैर्यशील मोहिते पाटील
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- ए.आय.या टेक्नॉलॉजी च्या जमान्यात विद्यार्थी हा सक्षम बनायला हवा त्यासाठी सर्व शिक्षकांनी काम करावे. सोबतच शिक्षक सहकार संघटना च्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील शिक्षक बांधवानी टाकाऊ पासून टिकाऊ हा उपक्रम राबवावा. विद्यार्थी यांनी सर्व प्रकारया बियांचे संकलन करून शाळेकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वृक्षारोपण करावे, जेणेकरून पर्यावरण समतोल व पर्यावरण संवर्धन यासाठी मदत होईल असे प्रतिपादन माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
ते अकलूज येथील अन्नपूर्णा सांस्कृतिक भवन येथे शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमासाठी
संघटनेचे अध्यक्ष नागनाथ बळवंतराव, शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती सुषमा महामुनी, संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिठ्ठलवाड ,राज्य सरचिटणीस निलेश देशमुख, जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे, रविंद्र जेटगी,विठ्ठल टेळे,संजय दवले, सुवर्णा गाडे, सुनिल पवार व प्रसिध्द व्याख्याते इतिहास कार प्रशांत सरूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गुणवंत आदर्श शिक्षक, राष्ट्रनिर्माण आदर्श शिक्षिका, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, प्रतिभावंत कलाकार, अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट कलाकार तसेच जिल्हास्तर कला, क्रीडा स्पर्धा विजेता प्राप्त शिक्षकांना यामध्ये दिपाली तापोळे, वनिता शिंदे, प्रिया तोरणे, गिरजा नाईक नवरे, मारुती जाधव,जगदीश गोडसे,संपत मिसाळ, चंद्रकांत ढसाळे, रूपाली आसबे, राबिया शेख,आत्माराम गायकवाड, शहजादी काझी , समुह नृत्य,समूह गीत गायन,दिलशाद काझी, शितल वाघ, विना पोळ, मंजुषा कांबळे, मंजुषा खताळ, कविता शेळके, सुवर्णा घोरपडे, राणी धायगुडे, सारिका धुमाळ, छाया भोईटे, अश्विनी गोरड,पार्वती भोमाळे, मीनल गाडे, प्रीती देशपांडे, नंदा करे, सुरेखा काळे, उज्वला निकम, सुनिता कोरे, विना गर्जे, मनीषा गायकवाड, नाहीद अख्तर अजीम चटर्की, सारिका कुदळे, सुनीता पोरे, दमयंती मांडवे ,अर्चना वाघ, रुक्मिणी पारसे, रूपाली धोत्रे,फहेमिदा अमहुसेन सय्यद यांना
माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष नागनाथ बळवंतराव यांनी केले असून राज्यकार्याध्यक्ष दीपक परचंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments