माढा मतदारसंघात नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना निधी मंजूर
खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नांना यश
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांमधील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे आणि बीपीएचयू (BPHU) बांधकामाच्या प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. या कामांमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.
या तालुक्यांमध्ये साधारण 9 कोटी खर्चाच्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये माढ्यात ग्रामीण रुग्णालयात (BPHU) बांधकामाच्या करिता 50.00 लाख, करमाळामध्ये ₹2.95 कोटी, माळशिरसमध्ये ₹2.35 कोटी, ग्रामीण रुग्णालय सांगोला बीपीएचयू: ₹50.00 लाख आणि पंढरपूरमध्ये ₹2.35 कोटींचा समावेश आहे. ज्यामध्ये करमाळातील कारंजे, नियोरे, फिसरे, मांगी; माळशिरसातील कोथळे, मैडद, शिंगोर्णी; आणि पंढरपूरमधील होळे, जळोली, पेहे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे बांधकाम आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये बीपीएचयू उभारणीचा समावेश आहे, ज्यामुळे स्थानिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या वाढीवर विशेष भर दिला असून, त्यांनी केंद्र सरकारकडे वारंवार मागणी करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे या तालुक्यांतील नागरिकांना लवकरच चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहे.
या कामांना तातडीने सुरुवात होण्याची अपेक्षा असून, संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर बांधकामाला गती देण्याचे नियोजन सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील या विकास प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना नवा आयाम मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
0 Comments