बीड सायबर पोलिसांची गुजरातमध्ये करोडोंची डील;
पीएसआयनंतर हवालदार, चालकही निलंबित
बीड (कटूसत्य वृत्त):-परवानगी न घेता आरोपी घेऊन गुजरातमध्ये गेले. तेथे गेल्यावर कोट्यवधी रुपयांची डील केल्याचा आरोप झाला. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांचे निलंबन झाले होते. आता त्यांच्यासोबत गेलेले हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांनाही बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. एकाच पोलिस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना दणका दिला आहे. यामुळे ठाणेदारही अडचणीत आले असून, कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे. सायबर पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पोलिस निरीक्षक देविदास गात यांच्याकडे होता. त्यात एक आरोपी अटक केला. त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली होती, परंतु याच पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रणजीत कासले, हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत हे तिघे जण खासगी वाहनाने या आरोपीला घेऊन गुजरात राज्यात गेले. त्या आधी त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत अथवा छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांची परवानगी घेतली . त्यानंतर गुजरातमध्ये गेल्यानंतरही त्यांनी एका व्यक्तीकडे पैशांची मागणी केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिस अधीक्षक काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी चौकशी कसले यांना तडकाफडकी निलंबित केले होते, तर गिरी आणि चालक भाग्यवंत यांची चौकशी केजचे सहायक अधीक्षक कमलेश मिना यांच्याकडे सुरू होती. त्याचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी या दोघांचेही निलंबन करण्यात आले.
0 Comments