महाराष्ट्रातील 'या' लाखो राज्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 10, 2025

महाराष्ट्रातील 'या' लाखो राज्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार

 महाराष्ट्रातील 'या' लाखो राज्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार

मुंबई  (कटूसत्य वृत्त):-अक्षय तृतीयाच्या आधीच कर्मचाऱ्यांची चिंता वाढली; महाराष्ट्रातील 'या' लाखो राज्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार  सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. आठवा वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. जानेवारी २०२६ पासून प्रत्यक्षात आठवा वेतन आयोगाची अंमलबजावणी शक्य आहे.

मात्र असे असतानाच राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक धक्कादायक PSI समोर येत आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा वेतनाचे उभ राहील आहे. खरंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आत्ताच उभा राहिलाय असं नाही तर वारंवार व्यक्ति कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा समोर येत असतो.एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळत नाही ही एक मोठी गंभीर बाब आहे. दरम्यान यावेळी म्हणजेच मार्च महिन्याचा पगारासाठी सरकारकडून महामंडळाला केवळ ४० कोटी रुपयांचा निधी दिला गेल्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हजारो कर्मचाऱ्यांचा पगार अद्यापही रखडलेला असून, दिलेला निधी अत्यल्प असल्याने पूर्ण वेतन देणे शक्य होणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. “सरकारने फक्त ४० कोटी रुपयांचा निधी एसटी बँकेकडे वर्ग केला आहे, पण वेतनासाठी किमान २५० ते ३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पैसे पुरेसे नाहीत," असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले. दरम्यान, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे तीव्र नाराजी असून, अनेक जिल्ह्यांत आंदोलक पवित्रा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱ्यांनी तातडीने संपूर्ण वेतनासाठी योग्य निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सरकारकडून या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages