Hot Posts

6/recent/ticker-posts

दलितमित्र स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी अनावरण

 दलितमित्र स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी अनावरण

ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, जल संधारणमंत्री संजय राठोड यांची उपस्थिती



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दलितमित्र आणि शिक्षणमहर्षी स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार, दि. १२ एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

       शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता मागास समाज सेवा मंडळ, नेहरु नगर, विजापूर रोड, सोलापूर येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते, राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली, आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

       स्व. चंद्राम  चव्हाण गुरुजी यांनी लमाण समाजसेवा संस्था या नावाने संस्था स्थापन करुन या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कार्य राबवून बहुजन वर्गातील अनेक कुटुंबाना आधार देण्याचे काम गुरुजींनी केले आहे. आज रोजी मागास समाज सेवा मंडळ, नेहरु नगर, सोलापूर या नावाने ही संस्था कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून आजमितीस निवासी वस्तीगृह, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्यु. कॉलेज, प्राथमिक आश्रम शाळा, माध्यमिक आश्रम शाळा, बी.पी.एड. कॉलेज, डी.एड. कॉलेज, तसेच सैनिकी मुलांची शाळा इत्यादी वेगवेगळ्या शाखांमधून हजारो विदयार्थी शिक्षण घेत असून, या माध्यमातून बहुजन वर्गातील हजारो कुटूंबाना उभे करण्याचे काम स्व. चंद्राम चव्हाण गुरुजी यांनी केले आहे.

       त्यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल, सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मंगळवेढ्‌याचे आमदार समाधान आवताडे, तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, विजापूरचे आमदार प्रकाश राठोड जालना जिल्हयातील मंठा येथील आमदार राजेश राठोड, तेलंगणा येथील मंत्री अमरसिंग तिलावत, गुलबर्गाचे खासदार उमेश जाधव, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्वामअप्पा पाटील, मोहोळचे माजी आमदार यशवंतराव माने, कर्नाटकचे माजी आमदार देवानंद चव्हाण, माजी आमदार दिलीपराव माने, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार शिवशरणअण्णा पाटील, माजी आमदार निर्मलालाई ठोकळ, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे, माजी शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत, करमाळ्याचे माजी आमदार नारायणआबा पाटील, अरुण लाड, माजी आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी आमदार नरसय्या आडम , माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार धनाजी साठे, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार रतिकांत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दिपक आबा साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भारत  जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

     याच कार्यक्रमात जय नायडू लिखित पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा तसेच गरिब, होतकरू, हुशार वि‌द्यार्थ्यांना पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, असे सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

       या पत्रकार परिषदेस पुतळा अनावरण समितीचे राज कस्तुरे, विजय चव्हाण,  जयवंत हक्के, रवि चव्हाण, संजय डोपरे, अशोक कुमार उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments