शिक्षणातून शिपाईपद कायमचे रद्द, तात्पुरत्या भरतीचा दिला शिक्षण संस्थांना अधिकार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 10, 2025

शिक्षणातून शिपाईपद कायमचे रद्द, तात्पुरत्या भरतीचा दिला शिक्षण संस्थांना अधिकार

 शिक्षणातून शिपाईपद कायमचे रद्द, 

तात्पुरत्या भरतीचा दिला शिक्षण संस्थांना अधिकार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायांची पदभरती बंद केल्याने राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल २५ हजार जागा कायमच्या रद्द झाल्या आहेत. दुसरीकडे २०२३ - २४ च्या संचमान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदे व प्रयोगशाळा सहाय्यक, अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहा हजार जागा भरल्या जाणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय निघाला आहे. पण, सरळसेवेतून या जागा भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आकृतिबंध निश्चित नसल्याने सहा ते सात वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नव्हती. आता तो आकृतिबंध निश्चित करून २०२३ - २४ च्या संचमान्यतेवरून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती होणार आहे. एकूण मंजूर पदांपैकी ८० टक्के पदभरती करता येणार आहे. पण, सध्याचा संस्थांमधील कार्यरत शिपाई सेवानिवृत्त झाल्यावर त्याठिकाणी अनुदानित तत्त्वावर शिपाई भरता येणार नाही. दुसरीकडे जो शिपाई पदोन्नतीसाठी पात्र आहे, त्याची पदोन्नती झाल्यावर रिक्तपदावर नवीन शिपाई भरता येणार नाही. असे निर्बंध शिक्षण विभागाने घातले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages