Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग २४ मधील रस्ता गायब

 प्रभाग २४ मधील रस्ता गायब

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-विजापूर रोड परिसरातील प्रभाग २४ जुना संतोष नगर येथील भांजे घर ते चतुर अपार्टमेंट जवळ ११ लाख ६० हजार रुपये किमतीचा आमदार फंडातून रस्ता मंजूर केला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करण्यापूर्वी मक्तेदाराने काम केल्याचा | फलकही लावला आहे. निवडणूक होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला, तरी रस्ता मात्र झाला नाही. मात्र काम केल्याचा फलक दिमाखात झळकत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हा रस्ता गायब झाल्याची तक्रार महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे केली आहे. या रस्त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून ११ लाख ६० हजार ५२७ रुपये किमतीचा प्रभाग २४ मध्ये भांजे घर ते चतुर अपार्टमेंटपर्यंत रस्ता मंजूर केला होता. हे काम अजयकुमार घोडके या मक्तेदाराला दिले होते. महापालिकेच्या रस्ते विभागाच्या उपअभियंता विभागाच्या |वतीने नव्याने हद्दवाढ झालेल्या नागरी सुविधा २०२२-२३ | मधील पॅकेज ए मधील हेडमधून हा रस्ता मंजूर केला आहे. ६ जुलै २०२३ मध्ये कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. परिसरातील नागरिकांनी मक्तेदाराला आठ महिन्यांचा कालावधी झाला, काम का केले नाही, या संदर्भात विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे. ई-निविदेच्या माध्यमातून मक्तेदार अजयकुमार घोडके यांना टेंडर मिळाले असताना अधिकारी आणि मक्तेदारांनी हातचलाखी करत हा निधी दुसऱ्या कामासाठी वळवल्याचे सांगत बिल परस्पर उचलल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी आयुक्तांकडे केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments