राजराजेश्वरी शाळेला उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, April 29, 2025

राजराजेश्वरी शाळेला उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रदान

 राजराजेश्वरी शाळेला उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रदान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेला जगदगुरु महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे उपक्रमशील शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रमुख अतिथी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, आहार तज्ञ डॉ सोनाली घोंगडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ शैलेश पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, उत्सव समिती अध्यक्ष सुनील रामशेट्टी, सचिव तम्मा कडगंची आदी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांना सन्मान चिन्ह,शाल,फेटा , पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेचे व राजराजेश्वरी शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
राजराजेश्वरी या प्राथमिक शाळेने कामगार वसाहतीतील मुलांना उत्कृष्ट ज्ञान देण्यासाठी या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक कार्याबरोबर कला, क्रीडा, सहल,सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे तसेच वृक्षारोपण , रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आदी सामाजिक उपक्रम उत्तमरीत्या राबविले तसेच पालक व विद्यार्थी समाधानी असल्याने हे पुरस्कार देण्यात आली आहे असे प्रतिपादन संयोजक मल्लेश पुरवंत यांनी सांगितले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages