नातेपुते सह माळशिरस तालुका कडकडीत बंद
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पहलगाम हत्याकांडाच्या निषेधार्थ नातेपुते शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष सतीश सपकाळ यांचे नेतृत्वाखाली शनिवार दि. २६ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या विरोधात भव्य निषेध मोर्चेचे आयोजन करून. पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी करून पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या होत्या व रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी माळशिरस तालुका बंदची हाक शिंदे गटाचे शिवसेनाप्रमुख सतीश सपकाळ यांनी दिली होती. पहलगाम हत्याकांडाच्या निषेधार्थ नातेपुते सह माळशिरस तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. शिवसेनेने पुकारलेल्या माळशिरस तालुका बंदच्या आव्हानास मोठा प्रतिसाद मिळाला. माळशिरस तालुका शिवसेनाप्रमुख सतीश सपकाळ व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नातेपुते शहरासह माळशिरस तालुक्यामध्ये फिरून दौरा केला व पहलगाम हत्याकांडाच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील सर्व जनतेने आपले आर्थिक व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला त्याबद्दल सतीश सपकाळ यांनी जनतेचे आभार मानले.
0 Comments