सौ सोनिया चंकेश्वरा बनल्या इनरव्हील क्लब सोलापूर स्टारलेट च्या अध्यक्षा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इनरव्हील क्लब सोलापूर स्टारलेट चा पदग्रहण समारंभ बुधवारी 30 जुलै २०२५ ला ज्येष्ठ समाजसेविका चंद्रिका चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. नूतन अध्यक्ष सौ.सोनिया चंकेश्वरा यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. तसेच सचिव पद सौ सौ गंगा लोणी आणि खजिनदार सौ आम्रपाली कोणापुरे, क्लब प्रोजेक्ट कॉर्डिनेटर सौ.काजल सिंदगी यांच्यासह अन्य कार्यकारिणी आणि पदाधिकारी यांनी शपथ घेतली. याप्रसंगी क्लबच्या माजी जिल्हाध्यक्ष रेखा माने, अनुराधा चंडक, DISO स्मिता चाकोते यांच्यासह विविध क्लबच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अर्चना आघाव आणि श्वेता पाटील यांनी केले.
0 Comments